जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयास सेंटर ऑफ एक्सलन्स हा दर्जा बहाल करण्यात आली आहे.
पुणे येथे संपन्न झालेल्या झोनल कॉन्फरन्स मध्ये मूजे महाविद्यालयास हा दर्जा प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे यांनी याक्षणी आनंद व्यक्त करत या संधीचे महविद्यालयातील सर्व विद्यार्थी पुरेपूर उपयोग करून घेतील अशी आशा व्यक्त केली. महाविद्यालयातील विद्यार्थी करीअर संसदेने याविषयी आपले मत व्यक्त करतांना असे नमूद केले की सेंटर ऑफ एक्सलन्स च्या अंतर्गत महाविद्यालयात करीअर संबंधीचे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात येतील .