मु.जे. महाविद्यालयात “लनर्स ट्रोव्ह डिजिटल प्लॅटफॉर्म”चे उदघाटन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या ज्ञान स्रोत केंद्राद्वारा निर्मित लर्नर्स ट्रोव्ह’ नावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ ई रिसोर्सेसचे उदघाटन  ग्रंथालय विभाग येथे झाले.

यावेळी केसीई सोसायटीचे कोषाध्यक्ष  डी. टी. पाटील,संचालक  हरीष मिलवानी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना.भारंबे, विवेक टोके यांची प्रमुख उपस्थिती होती. 21 व्या शतकाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सुविधा अत्यंत उपयोगी ठरणार आहे ह्या प्रणालीच्या माध्यमातून ई पुस्तक,विडिओ,ऑडिओ पुस्तक, अभ्यासक्रम आणि इतर अनेक संसाधने या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे .   या संदर्भात mjclibrary.in या संकेत स्थळावर उपलब्ध माहिती घेऊ शकतात.

अशी माहिती   ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक  डॉ.व्ही. एस.कंची यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना दिली. या सुविधांचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांना देखील घेता येणार आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन व आभार नितीन पाटील यांनी केले.  यावेळी विद्या राजहंस, मुकेश पाटील, भूषण पाटील,रवी इंगळे, प्रा.केतकी सोनार, सुभाष राठोड, समाधान बाविस्कर, लखीचंद महाजन, योगेश पवार, जितेंद्र घुगे, हेमंत जोशी आदी उपस्थित होते.

 

Protected Content