एप्रिल व मे महिन्याचा जिल्हा व विभागस्तरीय लोकशाही दिन रद्द

जळगाव – जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर तर दुसऱ्या सोमवारी विभागीय स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार 10 मार्च, 2019 पासून देशभर निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये असे निर्देश आहेत. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात पहिल्या सोमवारी होणारा जिल्हास्तरीय तर दुसऱ्या सोमवारी होणारा विभागीय स्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Add Comment

Protected Content