खामगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विद्युत कामगार महासंघाने (एमएसईडब्ल्यूएफ) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अजय कुमार गुजर कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली नोटीस बजावून संपाला पाठिंबा दिला आहे.
खामगाव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या आगार येथे सुरू असलेल्या आंदोलन स्थळी जाऊन कॉ.सी.एन. देशमुख कार्याध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत व कॉ.एन.वाय देशमुख झोनल सचिव अकोला, कॉ. मंगेश कानडे विभागीय सचिव खामगाव, कॉ. गणेश आटोळे विभागीय सहसचिव खामगाव, कॉ.अरुण काठोळे शाखा अध्यक्ष खामगाव शहर उपस्थित होते. उपस्थित संप कामगार यांना कॉ.सी.एन. देशमुख कार्याध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कामगार यांच्याकडून गजानन सोनोने यांनी संचालन केले.