पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल येथे शासनाच्या निर्देशानुसार १५ वर्षेवरील विद्यार्थ्यांना लसीकरण मोहीम अंतर्गत आज २५६ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
दरम्यान, हे लसीकरण श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले.
सदर लसीकरणाच्या वेळी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, श्री. गो. से. हायस्कूलचे तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. ठाकरे, ए. बी. अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख मनीष बाविस्कर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आर. बी. तडवी, कार्यालय अधीक्षक अजय सिनकर उपस्थित होते.
सदरचे लसीकरण कर्मचारी व परिचारिका भारती पाटील, नमन साळुंखे, मनीषा गढरी, प्रतिभा पाटील, वैशाली लोखंडे, मनिषा अहिरे, वैशाली महाजन व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पार पाडले. सदर लसीकरण संपूर्ण सोशल डिस्टंसिंग ठेवून तोंडाला मास्क लावून पूर्ण काळजी घेऊन मोहीम पार पडली. यावेळी लसीकरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.