एमपीएससीच्या मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०, २१ व २२ जानेवारी २०२४ दिवशी घेण्यात आलेल्या एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ चा निकाल आज १६ जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे. आज निकालासोबतच आयोगाने कट ऑफ लिस्ट देखील जाहीर केली आहे. एमपीएससी ची राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ दिलेल्या विद्यार्थ्यांना mpsc.gov.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

आज जाहीर झालेल्या निकालामध्ये मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे आता हे उत्तीर्ण विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत. मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे आयोगाकडून कळवण्यात आले आहे. एमपीएसीचा निकाल 3 टप्प्यांत लावला आहे. अंतिम निकाल हा त्यांची गोळाबेरीज करून जाहीर केला जाईल. त्यानुसार यादी प्रसिद्ध होते. एमपीएससीने २०२४ साठी नवीन परीक्षा पॅटर्न जाहीर केला आहे. आयोगाने परीक्षेच्या पॅटर्नमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ही लेखी परीक्षा ९ प्रश्नपत्रिकांची आणि १७५० गुणांची आहे. मुलाखतीचे २७५ मार्क्स आहेत. एकूण २०२५ गुणांची ही परीक्षा आहे.

Protected Content