मुलांना विष पाजून आईने छतावर उडी घेत संपवले जीवन

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोणार्क नगर येथील हरिवंदन अपार्टमेटमधील एका ३० वर्षीय महिलेने इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत आपले जीवन संपवले आहे. खळबळजनक बाब ही केली जीवन संपवणाऱ्या या महिलेची दोन्ही मुले घरात मृतावस्थेत आढळली आहे. ही घटना ८ मे रोजी सकाळीच्या सुमारास घडली आहे. त्या महिलेने जीवन संपवण्यापूर्वी एक व्हिडीओ मेसेजही शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या पतीवर अनेक आरोप केले आहे.

जीवन संपवण्यापूर्वी या महिलने मुलांना विष पाजले असावे असा पोलिसांना संशय आहे. दोन्ही मुलांमध्ये ८ वर्षांची मुलगी आहे तर २ वर्षांचा मुलगा आहे. ती महिला टेरेसवरून खाली कोसळल्यानंतर तेथे राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृत महिलेने लिहिलेली एक चिठ्ठी जप्त केली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या पतीवर छळ केल्याचा आरोप केला आहे. मृत महिलेचा पती हा कामानिमित्त पुण्यात होता, त्याला तपासात सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

Protected Content