दहा लाखांसाठी विवाहितेला मारहाण करत छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सिंधी कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेला गणपती नगरात सासरी १० लाखांची मागणी करत मारहाण करून छळ केल्याची केल्याचे बुधवारी ८ मे रोजी समोर आले आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात माहेर असलेल्या जिशा निखिल कटारिया वय ३४ यांचा विवाह गणपती नगरातील निखील प्रेमकुमार कटारिया यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला माहेराहून १० लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने पैसे दिले नाही म्हणून पती निखील कटारिया याने शिवीगाळ करत मारहाण केली. तसचे सासू आणि सासरे यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी बुधवारी ८ मे रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती निखील प्रेमकुमार कटारिया, मिना प्रेमकुमार कटारिया, प्रेमकुमार शुगनुमल कटारिया सर्व रा. गणपती नगर, जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहे.

Protected Content