धक्कादायक ! मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ बॉयफ्रेंडला पाठवले

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील सीआईओपीच्या वसतीगृहात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसतीगृहातील एका विद्यार्थिनीने आपल्या रूममधील मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिआहे बनवून बॉयफ्रेंड पाठवले आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेज व्यवस्थापनाकडे तक्रार केली. या तक्रारीनंतरही व्यवस्थापनाने कोणतीही कारवाई न केल्याने या विद्यार्थ्यांना मदतीसाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला. सगळा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणी २ जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्या गिरीश काळे आणि विनीत सुराणा हे दोन जण एकमेकांच्या ओळखीचे आहे. आर्या हिने आपल्या वसतीगृहातील मैत्रिणीचे व्हिडीओ चोरून काढून तिचा मित्र विनीत सुराणा याला पाठवले. या प्रकरणी आर्या आणि विनीत सुराणा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कॉलेजमधून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. नेमके हे कृत्य त्यांनी का केले याचा तपास पोलीस करत आहेत.शिवाजीनगरयेथील या शासकीय महाविद्यालयात एवढी मोठी घटना घडल्यानंतरही प्रशासन गप्प राहिल्याने प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. आरोपी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करणारी कॉलेज व्यवस्थापनाची व्यक्ती कोण आहे, याची चौकशी करून त्याच्यावरही पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. काही दिवसांपासून वसतिगृहातील एक विद्यार्थिनी आपल्या तीन रूममेटचे कपडे बदलताना व्हिडिओ बनवत होती. ही विद्यार्थिनी व्हिडिओ बनवून थेट आपल्या बॉयफ्रेंडला पाठवत असे. आरोपी विद्यार्थिनी हा व्हिडिओ तिच्या बॉयफ्रेंडला का देत होती, याची चौकशी केली जात आहे. पोलिसांनीही ही बाब गांभीर्याने घेतली असून तिच्या बॉयफ्रेंडने हे व्हिडिओ आणि फोटो इतरत्र पाठवले आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत

Protected Content