“मोरया” कंपनी आग प्रकरण : आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी कंपनीतील डी-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडली होती. या आगीत ५ जणांचा मृत्यू तर २४ जखमी होते. आता मृतांचा आकडा अजून वाढला असून एका तरुणाचा ऐन कामगार दिनीच बुधवारी १ मे रोजी उपचारादरम्यान जळगाव येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मोरया केमिकल कंपनीच्या आगीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. यात दोघांना अटक होऊन पुढील कार्यवाही पोलिसांनी केली आहे. या आगीत समाधान नारायण पाटील, रामदास घाणेकर, किशोर चौधरी, दीपक सुवा, सचिन चौधरी या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले आहे.

दरम्यान, जखमींपैकी मेहरूण परिसरात असणाऱ्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेला तरुण चंद्रकांत लक्ष्मण पाटील (वय २७,रा. किरवाडा, पो. साकळी बोराडे जि. धुळे) याचा बुधवारी दि. १ मे रोजी रोजी सकाळी ११.४२ वाजेच्या सुमारास उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. तो ७० टक्के भाजलेला होता. यामुळे चंद्रकांतच्या कुटुंबावर आघात कोसळला आहे. पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. मोरया कंपनीत गेल्या काही वर्षांपासून तो काम करीत होता. एमआयडीसी पोलीस स्टेशनला पीएसआय दीपक जगदाळे यांनी मृत्यूची नोंद केली आहे.

Protected Content