तरूणावर चाकूहल्ला करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील हुडको कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणाला चाकूने वार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी १ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, तेजस दत्ता कोर वय १९ रा. प्रभात गल्ली, चाळीसगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. चाळीसगाव शहरातील हुडको कॉलनीत बुधवारी १ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आलेला असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून अरबाज उर्फ जग्गा शेख , शोएब उर्फ शफया, अनिस शेख आणि एक अनोळखी अशा चार जणांनी तेजस याला शिवीगाळ करत चाकूने वार करून जखमी करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यात जखमी झालेल्या तेजसला चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मारहाण करणारे अरबाज उर्फ जग्गा शेख , शोएब उर्फ शफया, अनिस शेख आणि एक अनोळखी सर्व रा. हुडको कॉलनी, चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे करीत आहे.

Protected Content