हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लॉंड्रींगचा आरोप : सोमय्यांनी दिलेत पुरावे !

मुंबई | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लॉंड्रींगचे आरोप करत कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. यासाठी त्यांनी २७०० पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिल्याने खळबळ उडाली आहे. तर हसन मुश्र्रीफ यांनी सोमय्या यांच्यावर दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

आज किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील पुन्हा एका नव्या नेत्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. तर म्हणाले की, प्रताप सरनाईक, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अनिल परब, अनिल देशमुख, यांची नावं होती. आता यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियाने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. फक्त तेव्हढचं नव्हे तर बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लॉंडरिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे २७०० पेजेसचे पुरावे आहेत, ते मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिले आहेत, असं सोमय्यांनी सांगितलं.

बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले.  सीआरएम सिस्टम प्रा. लि  ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ   यांनी २ कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे,  २ कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे. मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. २०१८- १९ मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. बेनामी ट्राझॅक्शन १२७ कोटींचे व्यवहार समोर आले आहेत. या संदर्भात आपण मुंबई इडीकडे अधिकृत तक्रार करणार आहे. २७०० पानांचे पुरावे देणार आहे. माझ्याकडे २ मंत्र्यांचे फाईल तयार होते, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन मंत्री होते, त्यापैकी एकाचं प्रकरण आज मी सांगितले असे सोमय्या म्हणाले.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचे खंडण करत आपण त्यांच्यावर १०० कोटी रूपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.

 

Protected Content