कॉंग्रेसमधील इच्छुकांच्या सोमवारी मुलाखती

congress logo

जळगाव , प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कॉंग्रेसतर्फे सोमवार २९ जुलै रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.

या मुलाखती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव तसेच ओबीसी विभाग अध्यक्ष प्रमोद मोरे यांसह जिल्हा निवड मंडळ सदस्य उपस्थित राहणार आहेत. तरी विधानसभा निवडणुकी करीता काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व सामाजिक, राजकीय परिचय पत्रासह अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन जळगाव जिल्हा ग्रा. काँग्रेस कमिटी अध्यक्ष अँड. संदीप पाटील, ,जळगाव महानगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केले आहे.

असा आहे विधानसभा निहाय मुलाखतींचा कार्यक्रम
मुलाखतींना  सकाळी ११ वाजता भुसावळ तालुक्यातील इच्छुकांची मुलाखत घेऊन सुरुवात करण्यात येणार आहे. जळगाव शहर दुपारी १२ वाजता, जामनेर दुपारी १२.३० वाजता, चोपडा दुपारी १ वाजता तर एरंडोल तालुक्यातील इच्छुकांची मुलाखत दुपारी १.३० वाजता होणार आहे. तसेच चाळीसगाव तालुका दुपारी २ वाजता, जळगांव ग्रामीण दुपारी ३ वाजता व पाचोरा-भडगाव तालुका ३.३० वाजता मुलाखती होणार आहे. यासोबतच दुपारी ४ वाजता रावेर, मुक्ताईनगर सायंकाळी ४.३० वाजता तर सर्वात शेवटी अमळनेर तालुक्यातील इच्छुकांची मुलाखत सायंकाळी ५ वाजता घेण्यात येणार आहे.

Protected Content