यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेसोबत अश्लील चाळे करत अंगलट करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान सोमवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास महिलेच्या मुलीचा वाढदिवस असल्या कारणामुळे त्या मुलींसोबतघरात बसलेली असताना संशयित आरोपी रवींद्र चवदास कोळी हा त्यांच्या घरात घुसून अश्लील चाळे करत महिलेशी अंगलट केले. त्यानंतर तिचा विनयभंग केला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात धाव देऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी रवींद्र कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र बागोले करीत आहे.