Home क्राईम अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करत विनयभंग; एकाला अटक

अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करत विनयभंग; एकाला अटक

0
105


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी  १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शेतात एकटी असल्याचा फायदा घेत एका तरूणाने विनयभंग केल्याची घटना रविवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आले आहे. आनंदा उर्फ भैया वाणी रा. दापोरा जि.जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना संशयित आरोपी आनंदा वाणी याने अल्पवयीन मुलीचा हात पकडून तोंड दाबून तिचा विनयभंग केला आहे. हा प्रकार पिडीत मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर पिडीत मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी आनंदा उर्फ भैया वाणी रा. दापोरा जि.जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी गुन्हा दाखल करताच संशयित आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे ह्या करीत आहे.


Protected Content

Play sound