म्हैसवाडी येथे महिलेचा विनयभंग; मुलगा व पतीलाही मारहाण

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी  ।  येथून जवळ आलेल्या म्हैसवाडी येथे मागील भांडणाच्या कारणावरून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी फैजपूर पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथे ४५ महिला आपल्या कुटुंबियांसह राहते. ६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मागील भांडणाचे कारणावरून संशयित ब्रिजलाल राजाराम कोळी रा. म्हैसवाडी ता. यावल याने महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून चापटाबुक्क्यांनी मारहाण करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.  तर महिलेचा मुलगा आणि पती हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण केली. याप्रकरणी महिलेने फैजपूर पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित ब्रिजलाल राजाराम कोळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गोकुळ तायडे करीत आहे. 

 

Protected Content