जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता एकावर पोक्सो कायद्यांगर्तत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भागात बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा एकाने शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता पिडीत मुलीसोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत पिडीत मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. पिडीत मुलीसह तिचे नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहे.