Home क्राईम चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग


यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुलीचे वडील आपल्या कुटुंबासोबत घरात झोपले होते. त्यावेळी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आरोपी भालचंद्र पाटील घरात घुसला आणि त्याने मुलीचा उजवा हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. मुलीने घाबरून आरडाओरडा केला असता, आरोपीने तिला जीवेठार मारण्याची धमकी दिली आणि पळ काढला. त्यानंतर मुलीने देवदर्शनाहून परतलेल्या तिच्या आईला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भालचंद्र पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाल आहे.


Protected Content

Play sound