चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील गंभीर गुन्ह्यातील ११ गुन्हेगारांवर अखेर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्र येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी काढले आहे. या संदर्भात संबंधित आरोपींविरोधात मोक्का कायद्याखाली कलम लावण्यात आलेले आहे.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख अमोल छगन गायकवाड (वय-२५) रा. स्वामी समर्थ कॉलनी, चाळीसगाव, सुमित उर्फ बाबा अशोकराव भोसले रा. नागद रोड, चाळीसगाव, कृष्णा छगन गायकवाड रा. चाळीसगाव, संतोष उर्फ संता पहेलवान रमेश निकुंभ रा. हिरापूर ता. चाळीसगाव, विकी उर्फ शुभम विजय पावले (वय-२३) रा. हिरापूर ता. चाळीसगाव, श्याम उर्फ श्याम नामदेव चव्हाण (वय-२४) रा. हिरापूर, चाळीसगाव, सचिन सोमनाथ गायकवाड (वय-२२) रा. बाबाजी चौक, चाळीसगाव, जयेश दत्तात्रय शिंदे पाटील (वय-२४) रा. भोरस खुर्द ता.चाळीसगाव, उद्देश उर्फ गुड्डू सुधीर शिंदे (वय-२४) रा. हिरापूर ता. चाळीसगाव, योगेश रतन पांचाळ (वय-२६) रा. हिरापूर ता.चाळीसगाव आणि पुष्पराज उर्फ सुनील जगताप रा. पिंपरखेड ता. चाळीसगाव या ११ आरोपींना विरोधात वेगवेगळे स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहे. चाळीसगाव शहरात व तालुक्यात शांतता अबाधित राहावे, या अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांना आरोपींविरोधात मोक्का प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टोळीवर दाखल गुन्ह्यात मोक्का कायद्याचे कलम वाढविण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार त्यांनी तो प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर करण्यात आला. हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी अवलोकन करत २१ जानेवारी रोजी नाशिक परिक्षेत्र येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून आरोपीतांवर गुन्हे अभिलेख तपासणी करून २५ जानेवारी रोजी वरील सर्व ११ गुन्हेगारांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात मुक्का कायद्याखाली कलम लावण्यात आले.
हा प्रस्ताव तयार करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, अधिनस्त पोलीस अंमलदार सहायक फौजदार शेख इम्राहीम, पोहेकॉ सुनील पंडित दामोदरे यासह चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी सहकार्य केले.