शौचालयांच्या कामाची चौकशी करा, अन्यथा उपोषण : निळे निशाण संघटनेचा इशारा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंचायत समितीच्या अंतर्गत येणार्‍या शौचालयांच्या कामांची चौकशी करा, अन्यथा ३० जानेवारीपासून उपोषण करण्यात येईल असा इशारा निळे निशाण संघटनेने दिला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, निळे निशाण संघटनेचे अशोक तायडे यांनी एक निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या डोंगर कठोरा ,पाडळसा, सावखेडा सिम, थोरगव्हाण, वड्री, निमगाव ,गिरडगाव, कासारखेडा, चिंचोली, आडगाव, म्हैसवाडी यासह अनेक गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन या गावाच्या आजूबाजू ८ ते १० शौचालय ते प्रत्यक्ष गावांमध्ये वैयक्तिक ठेकेदाराकडून १२ हजार रुपये प्रमाणे एका गावामध्ये ४०० ते ५०० लाभार्थी यांना देण्यात आली आहे. शासकीय माहीतीवरून ही गाव मात्र हगणदारी मुक्त झाले आहे असून दिसून येत या गावांना सरकारकडून पुरस्कार जाहीर झाले तरीपण शौचालय बांधकाम करणारे ठेकेदार ग्रामपंचायत मधून काही बोगस ठराव घेऊन ते कामे मंजूर करण्यासाठी खोटे ठराव देत असा ग्रामसभेत न चर्चा करता हे ठराव मंजूर करीत आहेत.

पंधराव्या वित्त आयोगातून काही जण गावाच्या विकासाची व हिताची कामे रोखून ३०% रकमेची कोणतेही नियोजन न घेता सरपंच ग्रामसेवक ही सरकारची दिशाभूल करीत आहेत. स्वतःच्या कमिशन साठी असे दोघी लोक कोणतेही ठराव न घेता स्वतःची तिजोरी भरण्यासाठी सरकारची दिशाभूल करीत आहेत जिल्हा पातळीवरून ही बोगस कामे बंद करण्याचे आदेश तालुका स्तरावरील संबधीत अधिकार्‍यांना काढण्यात यावे जेणेकरून कामकाज झालेले कामाचे बिल रोखण्यात यावे ते सर्व झालेले कामे आहे ते त्वरित रोखण्यात यावेत, जेणेकरून शासनाच्या निधीचा अपव्य होणार नाही याची काळजी पंचायत समिती यावल प्रशासनाने घ्यावी व संबंधीतांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, कारवाई न झाल्यास आपण सत्र न्यायालय या संदर्भात अर्ज दाखल करण्यात येईल व येत्या ३० जानेवारी २३ पासुन यावल पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निळे निशाण सामाजिक संघटना यांचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी दिले आहे.

Protected Content