मोदींच्या लोकप्रियतेला ओहोटी

 

 

नवी दिल्ली,  वृत्तसंस्था । सोशल मीडियावर लोकप्रियतेच्या शिखरावर राहणारे नेते अशीही ओळख असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मन की बात कार्यक्रमासंदर्भात मात्र वेगळाच अनुभव आला. पंतप्रधानांच्या या भाषणाला युट्युब वर लाइकपेक्षा डिसलाइक्स मिळण्याचे प्रमाण अधिक आहे. लाइक्स डिसलाइस्कमधील अंतरही फार मोठे आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या यूट्यूब अकाउंटवर ३० ऑगस्ट असे शिर्षक असलेल्या व्हिडिओला सामवारी सकाळी ११.४० वाजेपर्यंत ३५ हजार लोकांनी लाइक केले होते. मात्र त्याच वेळी तब्बल ८९ हजार लोकांनी हा व्हिडिओ डिस्लाइक केला होता. भारतीय जनता पक्षाच्या यूट्यूब चॅनेलवर या व्हिडिओला आज दुपारपर्यंत ७८ हजार लाइक्स मिळाले होते. मात्र, त्याच वेळी तब्बल ५ लाख २५ हजार लोकांनी हा व्हिडिओ डिस्लाइक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओला सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत ५१ हजार लोकांनी व्हिडिओ लाइक केला होता. तर त्याचवेळी ३ लाख ८७ हजार लोकांनी या व्हिडिओला नापसंती दर्शवली. भाजपच्या या चॅनेलचे ३० लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत.

सोमवारी दुपारनंतर मात्र पंतप्रधानांच्या यूट्यूब चॅनेलवरील या व्हिडिओच्या लाइक्समध्ये वाढ होत गेली आणि डिस्कलाइक्सचे प्रमाण लाइक्सच्या तुलनेत कमी झाले. दुपारी पंतप्रधानांच्या यूट्यूब चॅनेलवर या व्हिडिओला ३१ हजार लाइक्स मिळाल्याचे स्पष्ट झाले, तर डिस्लाइकचा आकडा होता ११ हजार.

Protected Content