मोदींनी देशाचंं वाटोळं केलंय – राहुल गांधी

rahul gandhi

लातूर प्रतिनिधी । एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल होतोय तर दुसरीकडे नोकरी नसल्यामुळे तरुण बेरोजगार होतो. ४० वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी भारतात निर्माण झाली असून मोदींनी देशाचं वाटोळं केलंय. चंद्रावर रॉकेट पाठवून तरुणाचं पोट भरणार नाही. त्याला रोजगार द्या, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (दि.13) लातूरमधील औसा येथे प्रचारसभा घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

उद्योगपतींचे साडेपाच लाख कोटींच कर्ज माफ झाले. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? मोदी, शहा मूळ प्रश्नांवरून जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीसाठी औसामधील पहिल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्रातील काँग्रेसमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात काँग्रेसची पाळमुळं रुजली आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा यामुळे राहुल गांधी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार का? अशी शंका उपस्थित केली जात होती. पण राहुल गांधी यांनी शेतकरी, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य करत औसातील पहिली प्रचारसभा दणकावून सोडली.

Protected Content