मोदी सरकारने आमच्या हत्येचा कट रचलाय : फारुख अब्दुल्ला

faruk abdulla

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मोदी सरकारने आमच्या हत्येचा कट रचला आहे,असा गंभीर आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. अब्दुल्ला यांच्या दाव्यानंतर प्रचंड खळबळ उडालीय.

 

फारुख अब्दुल्ला यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन ३७० कलम हटविण्याच्या निर्णयावर टीका केली. सरकारने बळाचा वापर करुन काश्मीरमधल्या नेत्यांना अटक केली. माझं राज्य जळत असताना मी माझ्या घरात माझ्या मर्जीने कशाला राहिन? असाही प्रश्न अब्दुल्ला यांनी विचारला आहे. ज्या भारतावर माझा विश्वास आहे तो हा भारत नाही असंही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्याने नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही दगडफेकणारे किंवा ग्रेनेडचा मारा करणारे नाहीत. आम्ही शांततावादी लोक असून ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णया विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे फारुख अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. काश्मीर जळत असताना मी माझ्या मर्जीने घरात कसा राहिल? असा सवालही त्यांनी केला.

Protected Content