यावल प्रतिनिधी । एकीकडे इंटरनेट सुविधा वाढत असतांना दुसरीकडे तालुक्यातील उंटावद येथे मोबाईल सेवेच्या मोठ्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल टॉवर असूनही मोबाईलला रेंज नसल्याने इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉलसाठी ग्राहकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मोबाईल वरून फोन करायचा असल्यास ग्राहकांना घराच्या छतावर, शेतात किंवा गावाच्या बाहेर जावे लागते तेंव्हा व्यवस्थीत स्पष्टपणे संपर्क होतो तर उंटावद गावातील कोणत्याही मोबाईल नंबरवर संपर्क केला असता “आपण ज्या ग्राहकाशी संपर्क करू इच्छीता ते आता संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत किंवा त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही किंवा फोन बंद आहे. असे मॅसेज संपर्क करणाऱ्या मोबाइल धारकास ऐकायला मिळत असते, मग त्याचे नेमके कारण काय ? हे शोधने या कंपनींची जबाबदारी असल्यावर सुद्धा फक्त उत्पन्नाची बाजू म्हणून त्याच्याकडे या कंपन्या बघत आहेत की काय अशी चर्चा सध्या गावपातळीवरील या ग्रामस्थामध्ये होत आहे.
मार्चपासुन मागील महीन्यापासून संपुर्ण देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन सुरू आहे त्यामुळे घरातच करमणूकीसाठी टी.व्ही.संगणक व पर्याय म्हणुन मोबाईल यांचा वापर सर्वत्र मोठया प्रमाणावर होत आहे तश्यातच सर्वात जास्त मोबाईल इंटर्नेटचा वापर होतो. परंतु अपेक्षीत नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलवर इंटरनेट चालवणे शक्य होत नाही, त्यामुळे उंटावद व परिसरातील राहणाऱ्या ग्राहकांमध्ये मोबाईल कंपन्याबद्दल नाराजी पसरली आहे.
वोडाफोन, एअरटेल, जिओ, आयडिया या नामांकित कंपन्यांनी देशभरात आपल्या सेवा बाबतीत नाव कमावले असले तरी मात्र पैशांची लूट फक्त उंटावदच्या ग्राहकांची होतआहे हे नक्की.विशेष म्हणजे उंटावद येथील बहुतांशी ग्राहक आपल्याजवळ असलेल्या कंपन्यांच्या कस्टमर केअरशी संपर्कही करतात मात्र कोणतीही मोबाईल कंपनी याकडे अजिबात लक्ष देत नाही व आपल्या सेवेत कोणताही बदल करत नाही.
उंटावदपासून ३ कि.मी.अंतरावर मोबाईल कंपन्यांचे टाँवर असल्याने कदाचीत नेटवर्क पुरेसे मिळत नसेल परंतु मध्यंतरी काही दिवस नेटवर्क चांगले मिळत होते तर उंटावद येथे वरील सर्वच कंपन्यांचे ग्राहक मोठ्या संख्येत असल्याने उंटावदला या कंपन्यांनी टाँवर उभारणे आवश्यक आहे मात्र याकडे मोबाईल कंपन्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे.
या कंपन्या उंटावद व परिसरात ग्राहकांची निव्वड आर्थिक लूट करत आहेत म्हणून उंटावदच्या मोबाईल ग्राहकांमध्ये या सर्व कंपण्यांन बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर या मोबाईल कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या संबधीत विभागाने या मोबाईल कंपण्यांना जाब विचारावा व उंटावद येथील मोबाईल ग्राहकांची होणारी आर्थीक लुट थांबवुन सुरळीत मोबाईल सेवा द्यावी अशी अपेक्षित मागणी मोबाईलधारक ग्राहक करीत आहेत.