रशियन लसीच्या भारतात दोन चाचण्या अपरिहार्यच

नवी दिल्ली वृत्तसंस्था । रशियन लस या मार्गाने भारतात उपलब्ध होऊ शकते. सेंट्रल ड्रग्स स्टँण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) ही संस्था रशियाला भारतात फेज २ आणि ३ च्या चाचण्या करायला सांगू शकते. सुरक्षेच्या दृष्टीने नियमानुसार परदेशात निर्मिती झालेल्या लसीला भारतात या चाचण्या कराव्या लागतात.

फेज २ आणि ३ चे मानवी परीक्षण आवश्यक आहे. कारण लोकसंख्येच्या वेगवेगळया गटावर लसीची परिणामकारकता वेगवेगळी असू शकते. ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा सुद्धा याच मार्गाने प्रवास सुरु आहे. सीडीएससीओने अलीकडेच ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी घ्यायला परवानगी दिली. या आठवडयात ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी सुरु होऊ शकते.

जगातील अन्य देशांकडून लसीच्या १ अब्ज डोससाठी मागणी आली आहे असे रशियाच्या वेल्थ फंडाच्या प्रमुखांनी सांगितल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. रशियाच्या लसीमध्ये कुठल्या देशांनी रस दाखवालय त्यांची नावे त्यांनी सांगितली नाहीत. ‘स्पुटनिक व्ही’ असे या रशियन लसीचे नाव आहे.

ही लस आता प्रथम वैद्यकीय कर्मचारी आणि शिक्षकांना दिली जाईल. १८ जूनला रशियन लशीच्या चाचण्यांना सुरुवात झाली. सुरुवातीला ती ३८ जणांना टोचण्यात आली. या सर्वामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली.

Protected Content