मोबाईल धारकांना झटका ; उद्यापासून रिचार्य प्लॅन्स होणार दुप्पटीने महाग

Vodafone Idea Airtel and Reliance Geo

मुंबई वृत्तसंस्था । कोट्यवधी मोबाइल फोन वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ग्राहकांना या महिन्यापासून कॉल करण्यासाठी आणि इंटरनेटचा वापर करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण, व्होडाफोन- आयडिया, एअरटेल आणि रिलायन्स जिओ या तिन्ही आघाडीच्या कंपन्यांनी दरवाढीची घोषणा केली असून उद्यापासून, (दि.३) मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे ५० टक्क्यांपर्यंतवाढ करण्याचे जाहीर केले आहे.

२०१६ नंतर प्रथमच या कंपन्यांकडून दरवाढीची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वाधिक दरवाढ असल्याचे तज्ज्ञांनी म्हटलेय. व्होडाफोन- आयडिया आणि ‘भारती एअरटेल’ने उद्या मंगळवार, दि. ३ डिसेंबरपासून मोबाइल सेवेच्या प्रिपेड शुल्कात सुमारे ५० टक्क्यांपर्यंतवाढ करण्याचे जाहीर केले आहे. त्यापाठोपाठ सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’नेही ६ डिसेंबरपासून सुमारे ४० टक्के दरवाढीची घोषणा केल्याने मोबाइल वापरकर्त्यांच्या खिशाला भूर्दंड पडणार आहे.
रिलायन्स जिओच्या स्पर्धेत आतापर्यंत तुलनेने कमी दर ठेवून तग धरलेल्या व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या प्रिपेड दरवाढीमुळे संभाषण आणि मोबाइल इंटरनेट वापराचे दर जवळजवळ दुप्पट होणार आहेत. तसेच मोबाइल जोडणी महिनाभर अतूट राहावी यासाठी दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना किमान ४९ रुपयांचा ‘रिचार्ज’ करणे आवश्यक आहे.

Protected Content