चोपडा प्रतिनिधी । भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांच्या महाराष्ट्र राज्य दौरा असून ते चोपडा शहरात (दि.23) रोजी सकाळी 9 वाजता येणार आहेत. यानिमित्ताने बोथरा मंगल कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत राज्याध्यक्ष हस्तीमलजी बंम, राज्य प्रभारी नंदू साखला, राज्य उपाध्यक्ष हरकचंद बोरा, राज्य सचिव रत्नाकर महाजन, राज्य कार्यकारणी सदस्य विनय पारख, विभागीय अध्यक्ष तुषार बाफना आणि जिल्हा अध्यक्ष विनोद जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे
कार्यक्रमातील प्रश्न
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावर राजेंद्र लुंकड तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह अनेक मान्यवर राहणार आहेत. कार्यक्रमात भारतीय जैन संघटनेचे कार्य विशद विशाल करणार असून भारतीय जैन संघटना जैन व इतरत्र समाजासाठी काय काम करते, व्यापाऱ्यांसाठी अल्पसंख्यांकांच्या काय योजना आहेत ? शिष्यवृत्तीसाठी जैन समाजासाठी काय काय योजना आहेत? स्मार्ट गर्ल मूल्यवर्धन शिक्षण पद्धत सुजलाम सुफलाम कार्यक्रमांतर्गत ठिकाणी पाण्याचे नियोजन करणे, अशा विविध कार्य भारतीय जैन संघटनेचे असून त्या कार्याची इत्यंभूत माहिती राजेंद्र लुंकड हे देणार आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
तसेच या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांच्या आणि सकल जैन समाजातील तपस्वीचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आदिवासी आश्रम शाळेतील मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. सुजलाम सुफलामच्या अंतर्गत भारतीय जैन संघटना व पिपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट यांच्यामार्फत केलेल्या पाच गावांतील नागरिक देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
यांनी केले आवाहन
भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड चोपडा येथे पहिल्यांदाच येत आहेत. चोपडा वाशी यांसाठी ही अभिनंदनाची बाब आहे, यासाठी या सर्व कार्यक्रमात सकल जैन समाजातील महिला व पुरुषांनी उपस्थिती राहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष क्षितिज चोरडिया, तालुका सचिव दिनेश लोडाया तसेच महिला अध्यक्षा सपना टाटीया, सचिव मानसी राखेचा आणि विभागीय जनसंपर्क प्रमुख लतिष जैन यांनी केले आहे