मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होतच नाही : भागवत

mohan bhagwat

 

नागपूर (वृत्तसंस्था) लिंचिंग हा शब्दच भारतातला नसून, मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होतच नाही, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यानी केले आहे.एवढेच नव्हे तर, ‘लिंचिंग’ हा हिंदू समाजाला बदमान करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी लावला. आज सकाळी नागपुरातील रेशीमबाग येथे आयोजित संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. यावेळी भागवत यानी राजकीय, समाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर भाष्य केले.

 

यावेळी मॉब लिंचिंग सारखे शब्द वापरून हिंदू समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. विशिष्ट समुदायाप्रती सहानुभूती व्यक्त करण्यात येत असताना आपसी संघर्ष वाढवण्यात येत आहे, यापासून सतर्क राहण्याची गरज आहे असे भागवत म्हणाले.तर मॉब लिंचिंगवर बोलताना भागवत यांनी येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्धांच्या काळातील उदाहरणे दिली. येशू ख्रिस्ताच्या काळात एका स्त्रीवर सर्वांनी हल्ला केला, लोक तिला दगड मारू लागले. मात्र ज्याने पाप केले नाही, त्यानेच पहिला दगड मारावा असे येशू ख्रिस्ताने सांगितले. गावात पाण्यावरून झालेले भांडण गौतम बुद्धाने सोडवले असे सांगत लिंचिंग हा शब्द आपल्याकडील नाही, तो बाहेरून आला असून भारतात लिंचिंग हा प्रकार घडतच नसल्याचे भागवत म्हणाले.

Protected Content