Home Cities धरणगाव साकरे येथे सेवानिवृत्त जवान दीपक पाटील यांचा जल्लोषात स्वागत

साकरे येथे सेवानिवृत्त जवान दीपक पाटील यांचा जल्लोषात स्वागत

0
41


धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील साकरे येथील भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले दीपक पाटील यांचे २ मार्च २०२० रोजी साकरे गावात ढोलताशांच्या व डिजेच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सर्वप्रथम बा.च. भाटिया विद्यालयाचे अध्यक्ष तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य दिलीप पाटील यांनी जवान दीपक पाटील यांचे शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध संस्था व त्यांचे पदाधिकारी व संपूर्ण गावाकडून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून मिरवणुकीत सहभाग घेवून संपूर्ण गावात देशभक्तीमय वातावरण निर्माण करण्यात आले होते. मिरवणुकीनंतर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यालयाचे सर्व संचालक, मुख्याध्यापिका अनिता पाटील, चंद्रशेखर पाटील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडूनही दीपक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे शिक्षक एम.डी. गुजर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


Protected Content

Play sound