कल्याण ग्रामीण मतदार संघात मनसे राखला गड

MNS

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपले पहिले खाते उघडले आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

मनसेने इतर पक्षांच्या तुलनेत काहीशी उशिराने विधानसभा निवडणुकीत उडी घेतली. सुरुवातीला मनसे निवडणूक लढणार की नाही याबद्दल संभ्रम होता. मात्र, त्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी समोर येत भूमिका स्पष्ट केली आणि निवडणूक लढण्याची घोषणा केली. राज ठाकरेंनी राज्यभरात मोजक्या ठिकाणी सभा घेत मनसेला राज्यातील सक्षम विरोधीपक्ष बनण्यासाठी जनमत मागितले. मात्र, या निकालात त्यांना दुपारपर्यंत खातंही खोलता आलं नव्हतं. अखेर कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजू पाटील यांनी मनसेचं खातं उघडलं.
प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांनी 86,233 मते मिळाली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. म्हात्रे यांनी राजू पाटील यांना कडवी झूंज दिली. रमेश म्हात्रे यांना 80,665 मते मिळाली आहेत.

Protected Content