भुसावळात संजय सावकारे यांची हॅट्रिक (व्हिडिओ)

sanjay savkare

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी विजयश्री खेचून आणून हॅट्रीक साधली. प्रतिस्पर्धी महाआघाडीचे उमेदवार जगन सोनवणे व अपक्ष उमेदवार डॉ. मधू मानवतकर यांचा त्यांनी दारुण पराभव केला.

आ. संजय सावकारे यांनी सुमारे ५४ हजारांचा लीड त्यांनी मिळवला. ऐतिहासीक विजयानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आमदार संजय सावकारे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.नवीन प्रांताधिकारी कार्यालयात गुरुवारी सकाळी सव्वा आठ वाजेपासून मतमोजणीला प्रत्यक्षात प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासून आमदार संजय सावकारे यांनी मताधिक्यात आघाडी घेतली होती मात्र आठव्या व नवव्या फेरीत मात मताधिक्यात काहीशी घट झाली मात्र १७ व्या फेरीत आमदारांनी त्यांचाच गेल्या वेळचा ३४ हजार ६३७ मतांचा रेकॉर्ड तोडत ३५ हजार २८० मतांची आघाडी घेतली. अंतिम फेरीत जगन सोनावणे यांना १७ हजार २६६ मते मिळाली तर संजय सावकारे ६६ हजार ६१५ मते मिळाली. म्हणजेच ४९ हजार ३४९ मतांनी सावकारे यांचा विजय झाला.

Protected Content