पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आ. स्मिता वाघ यांचा पुढाकार

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत तीन गावांच्या पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्णत्वास आले आहे तर, राष्ट्रीय पेयजल योजनेनंतर्गत २० गावच्या योजनांची कार्यवाही गतीने सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार स्मिता वाघ यांनी दिली

आमदार स्मिता वाघ म्हणाल्या की, अमळनेर तालुक्यात ४८ गावाना टँकर ने पाणी पुरवठा सुरू आहे तर ३६ गावांना विहीरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तालुका सतत अवर्षंप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे होते. यामुळे शासनाकडून तापी, पांझरा आणि बोरी नदीच्या पात्रातून व काही गावातून पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आले होते. विशेष म्हणजे डांगर हे गाव सर्वाधिक टंचाईचे गाव होते. १९९२ पासून गावाला दरवर्षी टँकर ने पाणी पुरवठा केला जात आहे. दोन वर्षांपासून पावसाळ्यात देखील टँकर ने पाणी पुरवले जात होते. मात्र मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत गावाला पांझरा नदीवरून शिरढाणे येथून पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असून चाचणी सुरू आहे. येत्या दोन दिवसात डांगर गावाला नदीचे पाणी मिळणार असल्याने गावासाठी हा अविस्मरणीय क्षण असेल.

आमदार स्मिता वाघ पुढे म्हणाल्या की, याशिवाय, सारबेटे खु , जुनोने ,दोधवध हिंगोने या गावांच्या योजनांची कामे सुमारे ५० टक्के झाली आहेत. त्या देखील लवकरच पूर्णत्वास येतील. त्याच प्रमाणे आचार संहिता शिथिल झाल्याने खवशी बु( ४६ लाख), पिंपळी प्र ज(८४लाख), भरवस (७५ लाख), अंतुर्ली (६१ लाख), गडखांब, मांजर्डी , कचरे ( ९५ लाख ), कळमसरे (१ कोटी २९ लाख), मारवड ( १ कोटी ४५ लाख), बोदर्डे ( ३० लाख ), एकतास (३५ लाख), वावडे (८५ लाख),खेडी खु ( ५० लाख ) या योजनांची निविदा प्रक्रिया सुरू आहे तर कन्हेरे ( ४० लाख ),सारबेटे बु ( ५६ लाख ) , रुंधाटी ( ४० लाख ) या योजनांची पुढील मान्यता घेण्यासाठी नाशिक येथे मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे. शिरूड, कावपिंप्री, इंदापिंप्री येथील योजनेची उदभव बदलले असल्याने तांत्रिक मान्यता घेणे बाकी आहे. तर टाकरखेडा (८५ लाख)येथील योजनेचा स्रोत ची जागा बदलल्याने प्रक्रिया नव्याने होत आहे. आणि खेडी खुर्द, कुर्‍हे सिम व व्यवहारदळे या तिन्ही गावांसाठी ५० लाख रुपयांची योजना ची प्रक्रिया सुरू झाली अ असल्यामुळे टंचाईवर मात करता येणार असल्याची माहिती आमदार स्मिता वाघ यांनी दिली.

Add Comment

Protected Content