मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नेपाळमधील बस अपघातात 25 जणांचा बळी गेला असून या दुर्घटनेमुळे आमदार एकनाथराव खडसे यांनी यंदाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करणार असल्याचे जाहीर केले आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात नमूद केले आहे की, नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे.. या अपघातात आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांचे कुटुंबातील सदस्य मृत्युमुखी पडले. वेगवेगळ्या कुटुंबांवर मोठी शोककळा पसरली.. अशा प्रकारच्या मोठ्या आणि अत्यंत तीव्र दु:खातून सावरणे कुटुंबांना कठीणच नव्हे तर अशक्यच आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे, उचित वाटत नाही.. त्यामुळे यंदाचा दि 2 सप्टेबर रोजी वाढदिवस आपण अगदी साधेपणाने साजरा करणार आहोत.. कार्यकर्त्यांसह पदाधिकारी, समर्थकांनी यंदा कुठल्याही प्रकारचे शुभेच्छांचे होर्डिंग्ज, फलक लावू नये, जाहीरांती देऊ नये तथा पुष्प गुच्छ आणु नये आपण जिल्ह्यातील जबाबदार नागरिक म्हणून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंब, नातलगांच्या दु:खात सहभागी आहोत असे आवाहन आमदार एकनाथराव खडसे यांनी केले आहे.