एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल व पारोळा मतदार संघातून अमोल चिमणराव पाटील आणि माजी मंत्री सतिश आण्णा पाटील यांच्या जोरदार लढत होत आहे. एरंडोल विधानसभा मतदार संघाच्या पाचव्या फेरी अखेरीस अमोल पाटील यांना 21982 मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी भगवान पाटील यांना 15767 मिळाली असून माजी मंत्री सतिश पाटील यांना 8500 मते मिळाली आहे.
अधिक माहिती अशी की, एरंडोल विधानसभा मतदारसंघात् यंदा महायुतीच्या वतीने आमदार चिमणराव पाटील यांचे सुपुत्र तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना उमेदवारी मिळाली. याच्या सोबत माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी देखील अपक्ष उमेदवारी केली. सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संभाजीराजे पाटील आणि धरणगाव येथील मोठे ठेकेदार भगवान महाजन यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे. अमोल पाटील यांना 21982, भगवान पाटील यांना 15767 मिळाली तर माजी मंत्री सतिश पाटील यांना 8500 मते मिळाली आहे.