भुसावळ मतदार संघात आ. संजय सावकारे सुसाट; कार्यकर्त्यांचा जल्लोष !

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ विधानसभा मतदार संघातून भाजपाचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांची विजयाकडे वाटचाल दिसून येताच कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणावर जल्लोष केला.

भुसावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार संजय सावकारे हे २७ हजार २७७ मतांच्या फरकाने आघाडीवर दुपारी एक वाजेच्या दरम्यान आलेल्या निकालानुसार २३ पैकी १८ व्या फेरी अखेर आमदार संजय सावकारे यांना ८१ हजार ४५२ मते मिळाली आहे. तर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार राजेश मानवतकर यांना ४८ हजार ५९० मते मिळाले आहेत.

निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारांनी प्रचार फेऱ्या आणि कॉर्नर बैठका यांनाच प्राधान्य दिले. काँग्रेसचे डॉ. राजेश मानवतकर यांच्या साठी आ. एकनाथराव खडसे यांनी सभा घेतली. तर संतोष चौधरी यांनी देखील त्यांना पाठींबा दर्शविला. भुसावळ विधानसभा मतदार संघातून एकुण ५७.७५ टक्के इतके मतदान झाले आहे. भुसावळ शहरातील तहसील कार्यालयात शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुरू आहे. २३ फेऱ्यांपैकी १८ फेरी अखेरीस भाजपाचे आमदार संजय सावकारे यांना ८१ हजार ४५२ मते मिळाली, काँग्रेसचे राजेश मानवतकर यांना ४८ हजार ५९० मते मिळाली, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जगन सोनवणे ३ हजार ९५ मते मिळाली आहे. दरम्यान, आमदार संजय सावकारे यांचा विजय निश्चित होण्याचे संकेत मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Protected Content