आ. किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ आसनखेडा, माहिजी परीसरात रॅलीचे स्वागत

mahiji asankheda news

पाचोरा प्रतिनिधी । शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेनेच्या युवानेते सुमित किशोर पाटील यांनी आज आसनखेडा खु, आसनखेडा बु, माहिजी या भागाचा गावांमध्ये प्रचार रॅली काढली. यावेळी ग्रामस्थांकडून रॅलीचे स्वागत करण्यात आले.

या प्रचार दौऱ्यात त्यांनी आपल्या छोटे खानी सभेत संबोधित करतांना जनतेशी असलेले चांगले वर्तन हेच महत्वाचे असल्याचे सांगत परिवर्तनाची भाषा करणाऱ्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.या प्रचार दौऱ्यास जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असून या दौऱ्यात जि.प.सदस्य पद्मसिंग पाटील, भाजपाचे सभापती बन्सीलाल पाटील, एकलव्य संघटनाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, माजी जि.प.सदस्य राजेंद्र पाटील, गणेश वाघ, पंढरीनाथ पाटील, डॉ. हेमराज पाटील, युवासेनेचे जितू पाटील, युवासेने शहरप्रमुख संदीपराजे पाटील, भागवत पाटील,समाधान पाटील, कैलास पाटील, अवि पाटील, रोहित पाटील, युवराज काळे, सागर पाटील, विनोद आप्पा पाटील, अक्षय जैन, संदीप पाटील ग्रामस्थ, शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content