शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत योग शिबिर उत्साहात

yog shibir

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मू. जे. महाविद्यालयातील सोहम डिपार्टमेंट ऑफ योग आणि नॅचरोपॅथी मधील एमए व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मूलींची) येथे दहा दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सोहम डिपार्टमेंट ऑफ योग आणि नॅचरोपॅथी मधील एमए व्दितीय वर्षातील रुपाली पाटील, संगीता भंगाळे, अनुराधा फिरके, पियुष सोहाने आणि अक्षय खरे यांच्या मार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मूलींची) जळगाव येथे सुरु झालेल्या योग शिबिर घेण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रा.ज्योती भोळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सोहम डिपार्टमेंट ऑफ योग आणि नॅचरोपॅथी विभागाच्या प्रा.ज्योती वाघ उपस्थितीत होत्या. हे योग शिबीर एमए. योगिक सायन्स दिव्तीय वर्षातील मुळ अभ्यासक्रमावर आधारित असून निशुल्क घेण्यात आले.

योग शिबिरात रोज वेगवेगळ्या योगिक प्रक्रिया जसे ओमकार, पूरक हालचाली, सूर्य नमस्कार तोंडओळख, दीर्घश्वसन शिथिलीकरण हे शास्त्रशुध्द पद्ध्तीने शिकवले गेले. प्रा. ज्योती भोळे यांनी असे बहुमूल्य शिबीराचे आयोजन केले असून त्यांनी यावेळी शिबीराचे महत्त्व सोप्या शब्दात सांगितले. याचबरोबर एम. ए. दिव्तीय वर्षातील विद्यार्थी रुपाली पाटील, संगीता भंगाळे, अनुराधा फिरके, पियुष सोहाने, अक्षय खरे यांचे आभार मानले. प्रा. ज्योती वाघ यांनी अश्या शिबिरांच महत्त्व सोप्या भाषेत पटवून दिले. या प्रसंगी शिबीर आयोजित करणारे एम.ए.दिव्तीय वर्षातील अध्यापक विद्यार्थी तसेच शिबिरात भाग घेणारे विद्यार्थीनीनी आपले मनोगत व्यक्त केले. शिबिरासाठी सोहम डिपार्टमेंट ऑफ योग आणि नॅचरोपॅथीचे संचालक प्रा. आरती गोरे, प्रा. देवानंद सोनार, प्रा. पंकज खासबागे, प्रा. गीतांजली भंगाळे, प्रा. ज्योती वाघ या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content