पाचोरा प्रतिनिधी । येथील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांनी आज बांबरुड-कुरंगी गटात हडसन, पहाण, मोहाडी झंझावती प्रचार दौरा केला. आ.पाटील यांनी घरोघरी जावून माता भगिनींचे वडीलधारी मंडळींची आशिर्वाद घेत पुन्हा आपल्या सेवेची संधी देण्याचे आवाहन केले. बांबरुड-कुरंगी हा परिसर कायम सेना-भाजपा महायुतीच्या आजपर्यंत पाठीशी राहिला आहे. परिसरातील घराघरातून हजारो ग्रामस्थ आमदार पाटील यांना पाठींबा देत प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते.
यांनी नोंदविला सहभाग
यावेळी जि.प.सदस्य पदमसिंग पाटील, संचालक कृ.उ.बा.पांढरी अण्णा, युवासेनेचे अजय जैस्वाल, शरद तावडे, शिवाजी तावडे, पंकज सर, विनोद तावडे, बालु पाटील, डॉ. शेख, दिनकर पाटील, डॉ.सैय्यासे, उमेश चौधरी, राजू पाटील, शरद पाटील, शरद तावडे, देविदास पाटील, डॉ.हेमराज पाटील, किशोर कोळी, सोपान पाटील, सोनू पाटील, विनोद पाटील, गुलाब पाटील, अनिल सोनवणे, भरतबापू पाटील, सुनील पाटील, डी.के.पाटील, राजू तायडे, गोपाल पाटील, योगेश पाटील, अतुल पाटील, युवराज काळे, साहेबराव पाटील, निलेश गवळी, अवि पाटील, संदीप पाटील, कैलास माळी, रोहित पाटील, विलास पाटील, बालाजी पाटील आदी मान्यवर व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.