Home क्रीडा राज्य तलवारबाजी संघटनेच्या उपाध्यक्षपदी आमदार चंद्रकांत सोनवणे

राज्य तलवारबाजी संघटनेच्या उपाध्यक्षपदी आमदार चंद्रकांत सोनवणे

0
34
chandrakant sonavane

chandrakant sonavaneजळगाव प्रतिनिधी । राज्य तलवारबाजी संघटनेच्या उपाध्यक्षपदी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथे राज्य तलवारबाजी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. याच्या अंतर्गत संघटनेच्या अध्यक्षपदी छत्रपती पुरस्कारप्राप्त अशोक दुधारे, उपाध्यक्षपदी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, तर सचिव म्हणून छत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. उदय डोंगरे यांची एकमताने निवड केली. आमदार सोनवणे यांची निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीनिमित्त माजी महापौर विष्णू भंगाळे यानी आमदार सोनवणे यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रशांत जगाताप, डॉ. प्रदीप जळवेलकर, डॉ. दिनेश पाटील, अरुण श्रीखंडे, प्रताप कोळी, डॉ. क्षितिज भालेराव उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound