आ. चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा : संत मुक्ताई मंदिरासाठी मिळणार १५ कोटींचा निधी

मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने संत मुक्ताई मंदिरासाठी तब्बल १५ कोटी रूपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

कोथळी येथील संत मुक्ताई समाधी स्थळाच्या रखडलेल्या बांधकामासाठी वाढीव निधी मिळावा या मागणीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. या अनुषंगाने मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांची देखील उपस्थिती होती. यात सार्वजनीक बांधकाम विभागाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना वाढीव कामाचे प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. यावर मुख्यमंत्र्यांनी येत्या काही दिवसांमध्ये १५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

या बैठकीला संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र हरणे महाराज, संत मुक्ताई समाधी स्थळ कोथळीचे व्यवस्थापक हभप उध्दव महाराज जुनारे, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील आदींसह वरिष्ठ अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Protected Content