Home आरोग्य आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेला प्रारंभ

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेला प्रारंभ

0
12


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यात पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत चिमुकल्या बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

देशाला कायमस्वरूपी पोलिओमुक्त ठेवण्यासाठी तसेच प्रत्येक बालकाचे आरोग्यदायी आणि सुरक्षित भविष्य घडविण्यासाठी पोलिओ लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक पालकाने आपल्या परिसरातील पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजून या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. निरोगी बालक, सुदृढ कुटुंब आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. पोलिओसारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज भाऊ राणे, शिवसेना उपजिल्हा संघटक पंकज कोळी, नगरसेवक निलेश शिरसाट, चंद्रकांत मराठे यांच्यासह शिवसेना अनुसूचित जाती-जमाती तालुकाध्यक्ष राजूभाऊ वानखेडे, शिवसेना-युवासेना परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी तसेच महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या वतीने पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यासाठी विविध केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या मुलांना जवळच्या पोलिओ बूथवर नेऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


Protected Content

Play sound