आ. चंद्रकांत पाटील मैदानात : मुक्ताईनगरात सुरळीत झाला वीज पुरवठा !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात दोन मोठे विजेचे टॉवर पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वत: कामावर लक्ष ठेवत पाठपुरावा केल्याने रात्री उशीरा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

काल सायंकाळच्या सुमारास हरताळा गावाजवळ १३२ केव्हीए क्षमतेच्या वीजेचे वितरण करणार्‍या दोन टॉवर कोसळले. सदर दोन्ही टॉवर ही खाली वाकले असून यात एक तर जमीनदोस्त झाला आहे. दोन्ही टॉवर कोसळल्यामुळे मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये त्याच क्षणाला वीज पुरवठा खंडीत झाला होता. वादळी वार्‍यामुळे टॉवर कोसळल्यामुळे किमान आज दुपारपर्यंत वीज येणार नसल्याची अधिकृत माहिती अभियंता ब्रिजेश गुप्ता यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली होती.

दरम्यान, वीज गेल्यानंतर युध्द पातळीवर काम सुरू करण्यात आले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनस्थळाला तातडीने धाव घेत भेट दिली. यानंतर परिस्थितीचा आढावा घेतल्यावर त्यांनी लागलीच राज्याचे उपमुख्य मंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून यासंदर्भात चर्चा केली. यानंतर स्वतः येथे थांबून आवश्यक यत्रंणा व साहित्य येथे उभे करून स्वतः घटनास्थळी जातीने उपस्थित राहिले. यामुळे येथे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी देखील सकारात्मक प्रयत्न केल्याने अवघ्या काही वीज आली.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना वीज वितरणच्या चमून साथ दिल्याने काही तासांमध्ये वीज पुरवठा सुरळीत झाला. यात मुक्ताईनगर महावितरणचे कार्यकारी अभियंता ब्रिजेशकुमार गुप्ता,उपअभियंता श्री.ढोले,महापारेशनचे खाचणे, वितरणचे श्री.महाजन तसेच सर्व कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेतले. सध्या भीषण गर्मी जाणवत असल्याने मुक्ताईनगरकरांना यामुळे दिलासा मिळाला. याप्रसंगी यावेळी आमदारांसह मुक्ताईनगर येथील नगरसेवक पियूष मोरे, संतोष (बबलू) कोळी , मुकेश वानखेडे, निलेश शिरसाट यांच्यासह शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content