यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार अमोल जावळे यांच्या पुढाकाराने भालोद येथील सहकारी दुध उत्पादक संस्थेची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे.
तालुक्यातील येथील भालोद दूध उत्पादक सहकारी सोसायटीची सन२०२५ते २०३० या संस्थेची पंचवार्षिक कार्यक्रम माघारी च्या अंतिम दिवशी जेवढे व्यवस्थापन समितीचे सदस्य संख्या तेवढेच असल्याने या व्यवस्थापन मंडळास बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वासुदेव शालिग्राम पाटील यांनी जाहीर केले.
यावल-रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे त्यांनी स्वागत केले आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढील प्रमाणे – परतणे शरद माधव महाजन, गिरीश डालू इंगळे, धनराज प्रल्हाद चौधरी, किरण गोविंदा इंगळे,जयंत शशिकांत परतणे, मितेश राजेंद्र इंगळे ,अशोक लक्ष्मण चौधरी, निळकंठ इच्छाराम नेहते, राजेंद्र गणेश इंगळे,हेमचंद्र मुरलीधर वारके, वैभव जीवन महाजन, अशोक देवराम यांची सर्वसाधारण चौधरी खेमचंद्र योगराज इतर मागास वर्गीय महिला राखीव मधून बारी भारती संजय, चौधरी विद्या नितीन; अनुसूचित जाती मधून भालेराव भीमराव भास्कर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.
सदर प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी हेमंत अरुण जावळे व दूध संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले व नवनिर्वाचित व्यवस्थापकीय मंडळाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे व सर्वांनी स्वागत केले आहे