Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; अपहरणाचा गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; अपहरणाचा गुन्हा दाखल

0
181


भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रविवारी ८ मार्च रोजी दुपारी १ वाजता पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून भडगाव पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या लहू गुलाब ठाकरे यांची १६ वर्षे ७ महिने वयाची मुलगी ७ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली. कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी अजय गंभीर मोरे (रा.वडगाव सतिचे, ता. भडगाव) याने पीडितेस कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर पोलीस ठाण्यात धाव घेवून याबाबत तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound