Home क्राईम लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे  या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस संशयिताचा कसून शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील श्रीरामनगर, भिलवाडी भागात राहणारा २० वर्षीय तरुणाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . फिर्यादीची १७ वर्षे ६ महिने वयाची मोठी बहीण १० मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सर्व कुटुंबीय घरी असताना घरातून गेली होती . दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तिने आपल्या भावाला फोन करून सांगितले की, ती आपल्या लहान बहिणीला घेऊन येत आहे त्यावेळी ती पवन मोहन गोसावी याच्या मोटारसायकलवर बसून गेली होती.

मात्र, बराच वेळ उलटून गेल्यानंतरही बहीण घरी परतली नाही. यामुळे कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच मुक्ताईनगर, भुसावळ रोड आणि आसपासच्या परिसरात सर्वत्र शोध घेऊनही तिचा कुठेही पत्ता लागला नाही. तपासादरम्यान संशय बळावला की, पवन मोहन गोसावी (रा. श्रीरामनगर, मुक्ताईनगर) यानेच तिला लग्नाचे किंवा इतर कसले तरी आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेले आहे.

या प्रकरणी फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसांनी पवन गोसावी याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे


Protected Content

Play sound