Home क्राईम भुसावळमध्ये गावठी पिस्टलसह युवक जेरबंद 

भुसावळमध्ये गावठी पिस्टलसह युवक जेरबंद 


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात पोलिसांनी गावठी पिस्टलसह एक तरुणाला जेरबंद केल्याची माहिती मिळाली आहे. डी. बी. पथकाच्या कार्यवाहीत ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई केली आहे.

भुसावळ पोलीस स्टेशनच्या डी. बी. पथकाला गुप्त बातमी मिळाल्याप्रमाणे, शिरपुर कन्हाळा रोडवरील घोडेपिर बाबा दर्गा भागात एक व्यक्ती गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टलसह जिवंत राऊंड घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक राहूल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकातील पोलिसांनी त्वरित कारवाई केली.

या कारवाईत अरसद अली शेख खालीद अली (वय 19) या आरोपीला ताब्यात घेतले गेले. आरोपीच्या अंग झडतीतून 40,000 रुपये किमतीची लोखंडी गावठी पिस्टल मॅगझीनसह काळ्या रंगाची प्लॅस्टीक ग्रिप आणि 1 जिवंत राऊंड (1,000 रुपये किमतीचा) जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की ही गावठी पिस्टल मोहम्मद राजीक मोहम्मद आरीफ (वय 19) यांनी त्याच्याकडे ठेवण्याकरता दिली होती.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींबद्दल गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा क्र. 236/2026 नुसार आर्म्स अॅक्ट 3/25 आणि म.पो.का. कलम 1, 37, 135 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधीकारी भुसावळ भाग केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक राहूल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकों 3077 कांतीलाल केदारे करत आहेत.


Protected Content

Play sound