Home आरोग्य यावलमध्ये जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर

यावलमध्ये जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावलमध्ये आज आश्रय फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्या मित्र परिवारासह केले. हा शिबीर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने “रक्तदान श्रेष्ट दान” या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आला होता.

शिबीरामध्ये युवा वर्गासह महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रक्तदानाच्या या उपक्रमामुळे स्थानिक समुदायात सामाजिक जबाबदारी आणि जनकल्याणाच्या भावना प्रबळपणे दिसून आल्या. रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी डॉ. कुंदन फेगडे यांच्या मित्र परिवाराने मोठे परिश्रम घेतले.

या उपक्रमात डॉ. जागृती फेगडे, सागर लोहार, राजु महाजन, रितेष बारी, मनोज बारी, उज्वल कानडे यांसह मित्र परिवाराचे सदस्य सक्रिय सहभाग घेत होते. स्थानिक लोकांनीही या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


Protected Content

Play sound