चोपडा तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; एकावर गुन्हा दाखल


चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातील एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना ७ मे रोजी घडली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी ७ मे रोजी रात्री १० वाजता पिडीत मुलीला गावात राहणारा कल्पेश गणेश बाविस्कर रा. मालखेडा ता.चोपडा याने लग्नाचे आमिष दाखवत पिडीत मुलीला फूस लावून पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपी कल्पेश बाविस्कर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास कावेरी कमलाकर ह्या करीत आहे.