भाजपची अवस्था पाण्याच्या बाहेर काढलेल्या माशासारखी- थोरातांची टीका

Balasaheb thorat news

पुणे प्रतिनिधी । सत्ता नसल्याने भाजपची अवस्था पाण्याच्या बाहेर काढलेल्या माशासारखी झाल्याचा टोला मारत महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी जोरदार हल्लाबोल केला.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान समारंभासाठी बाळासाहेब थोरात हे पुण्यात आले होत.त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, सत्ता न मिळाल्यामुळे विरोधकांची अवस्था ही पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी झाली आहे. हे त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. राज्यात भाजपाचं लोटस किंवा आणखी कुठलंही ऑपरेशन यशस्वी होणार नाही, आम्ही सर्वजण एकत्र चांगलं काम करू असे ते म्हणाले.

दरम्यान, तीन पक्षांच हे सरकार असल्यामुळे खातेवाटपासह थोडाफार उशीर होऊ शकतो, सर्व निर्णय हे विचारपुर्वक घ्यावे लागतात. मात्र, खातेवाटपाची यादी आज निश्‍चित जाहीर होईल, कदाचित आतापर्यंत ती झाली देखील असेल असं देखील थोरात यांनी यावेळी सांगितलं. तर, खाते वाटपाची यादी जाहीर करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री व राज्यपालांचा असल्याचेही ते म्हणाले.

Protected Content