मंत्री संजय सावकारे यांनी घेतला नगरपालिकेतील कामांचा आढावा


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी गुरूवारी सकाळी भुसावळ नगरपालिकेला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. या दौर्‍यात त्यांनी भुसावळ नगरपालिकेतील विविध विभागांची माहिती घेतली तसेच प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीयांनी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना प्रलंबित कामे १०० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील शासकीय कार्यालयांचा आढावा घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री संजय सावकारे यांनी भुसावळ नगरपालिकेच्या विविध कामांची स्थिती जाणून घेतली.

यावेळी मंत्री सावकारे यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सोयीसाठी सेवा जलद आणि कार्यक्षम पद्धतीने देण्याच्या सूचना दिल्या. नगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती घेत असताना त्यांनी शहरातील पायाभूत सुविधांबाबतही चर्चा केली. रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता मोहिमांबाबत त्यांनी विशेष लक्ष घालण्याचे आदेश दिले.

नगरपालिकेतील नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने अधिकाऱ्यांनी काम करावे आणि थेट नागरिकांशी संवाद साधावा, अशी सूचना सावकारे यांनी दिली. नगरपालिकेतील काही रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन देत त्यांनी अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.